पिंपरीमध्ये ड्रायव्हरची निर्घृण हत्या

पिंपरी दि.२८ – पिंपरी भागात एका गाडीच्या ड्रायव्हरची लोखंडी हत्याराने वार करुन रविवारी रात्री हत्या करण्यात आली.यासंदर्भात दोनजणांना अटक करण्यात आली आहे.वडाणी शहदा येथे राहणारा सुनील गंगाजी गोसावी हा ड्रायव्हर रविवारी पिंपरीतील ओम साई एंटरप्राईज या फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये आला होता. त्यानंतर रात्री याच ठिकाणी तो विश्रांतीसाठी थांबला. रात्री १२ च्या सुमारास तेजस शिंदे आणि सुनील कुदळे हे  दोघे या ठिकाणी पोहचले. त्यावेळी सुनील आणि ह्या दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन शिवीगीळ झाली.

चिडलेल्या कुदळे आणि शिंदे यांनी लोखंडी हत्यार सुनीलच्या डोक्यात घातले. यात सुनीलचा जागीच मृत्यू झाला. सुनील ठार झाल्याचे पाहून दोघांनी पळ काढला. सोमवारी सकाळी कामगार कामावर आले, तेव्हा त्यांना सुनीलचा मृतदेह दिसला. ही माहिती लगेच पोलिसांना देण्यात आली.

Leave a Comment