नवी दिल्ली : खाद्यान्न महागाई दरात वाढ

नवी दिल्ली २५ मार्च – सलग तीन आठवड्यांच्या घसरणीनंतर १२ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात खाद्यान्नाचा महागाई दर वाढला आहे.९.४२ टक्क्यांच्या तुलनेत १०.०५ टक्के इतका महागाई दर नोंदवला गेला आहे.महागाई आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षभरात अनेकवेळा पतधोरणात हस्तक्षेप केला आहे. महागाई दर असाच चढा राहिला तर आगामी काळात पुन्हा पतधोरणात हस्तक्षेप केला जाऊ शकतो,असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Leave a Comment