नागपूर : राज्याचा अर्थसंकल्प विदर्भाची घोर निराशा करणारा – विदर्भ जनआंदोलन समिती

नागपूर २४ मार्च – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत सादर केलेला आघाडी सरकारचा अर्थसंकल्प पूर्णतः दिशाहीन आणि पोकळ घोषणांचा डोंगर असल्याची टीका करीत उपमुख्यमंत्री पवार यांनी विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.

पीक कर्जावर व्याज सवलत ही पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाभदायक असल्याकडे लक्ष वेधत आज कर्जफेडीची क्षमता नसल्याने नवे कर्ज घेऊ न शकणार्याक विदर्भातील शेतकऱ्यांच्या कर्जाची पुर्नबांधणी करण्याची घोषणा अपेक्षित होती, तिथे सरकारने निराशा केल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. विदर्भाच्या सिचनाचा अनुशेष दूर होण्यासाठी ५ हजार कोटींची तरतूद हवी होती. मात्र इथेही उपमुख्यमंत्री विदर्भावर अन्याय केल्याची टीका तिवारी यांनी केली असून हे सरकार आता दारूवर कर वाढवून आलेल्या वाढीव महसुलातून कर्मचाऱ्यांचे पगार देणार का असा प्रश्न विचारला आहे.

Leave a Comment