अकोला : बिबट्याच्या हल्ल्यात एक जखमी

अकोला २४ मार्च – अकोट तालुक्यातील पानज-आकोली रस्त्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एकजण जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.पानज-आकोली रस्त्यालगत शेतशिवार असून झुडपीजंगल आहे.दुपारी रस्त्याने जात असलेल्या एका नागरिकांवर बिबट्याने हल्ला केला.यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावी, अशी मागणी करण्यात येत आहे

Leave a Comment