पुणे : शेतीमालावरील निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी मध्यवर्ती शासकीय इमारतीला शेतकऱ्यांचा घेराव

पुणे दि २१ मार्च : शेतीमालावरील निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी येथील शासकीय कार्यालये असलेल्या मध्यवर्ती शासकीय इमारतीला घेराव घातला.

शासन शेतकऱ्यांबाबत उदासीन आहे. शेतीसाठी आवश्यक साधन सामुग्रीचे दर सातत्याने वाढत आहेत तर शेतीमालाचे दर घसरत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना दिलासा देणारी धोरणे राबविण्याऐवजी निर्यातबंदीसारखे निर्णय घेऊन शासन शेतकरी कर्जबाजारी कसे राहतील हेच पहात आहे; असा आरोप पाटील यांनी केला. आज पर्यंत सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी शासनाला त्याचे सोयर सूतक नाही; अशी टीका त्यांनी केली.

जोपर्यंत साखर, कांदा, तेलबिया आणि कापसासारख्या शेतीमालावरील निर्यातबंदी उठत नाही तोपर्यंत घेराव घातला जाईल; असा इशारा संघटनेने दिला आहे.

Leave a Comment