नवी दिल्ली : जपानमधील किरणोत्सर्गाची पातळी हानीकारक नाही – आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संघटना

नवी दिल्ली दि. २१ मार्च गेल्याच आठवडयात जपानमध्ये झालेला भूकंप व त्यानंतरचा किरणोत्सर्ग मानवास धोकादायक नसल्याचा निर्वाळा आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संघटनेच्या तज्ञांनी दिला आहे.

किरणोत्सर्गाबाबतची माहिती ४७ जपानी शहरांमधून नियमितपणे मिळवत असल्याचे आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संघटनेचे शास्त्रज्ञ व तांत्रिक सल्लागार ग्राहम अॅन्ड्र्यू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. टोकियो आणि इतर शहरामध्ये किरणोत्सर्गाचे प्रमाण अद्यापही कमी असल्यामुळे तेथील नागरिकांना कोणताही  धोका नसल्याचे त्यांनी सांगितले.

किरणोत्सर्गाची पाहणी व नियंत्रण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संघटनेने एक मदतपथक जपानला पाठविले आहे. किरणोत्सर्गाच्या टोकियोतील पहिल्या चाचणीत १३१ – आयोडिन व १३७ – सेजियम आढळले नाही. हे आण्विक इंधनाचे घटक आहेत असेही अॅन्ड्र्यू म्हणाले.

Leave a Comment