नवी दिल्ली : एस्सार लंडनमध्ये रिफायनरी खरेदी करणार

नवी दिल्ली २१ मार्च – लंडनस्थित एस्सार एनर्जी पीएलसी कंपनीने इंग्लंडमधील रॉयल डच शेलच्या स्टॅन्लो रिफायनरीची ३५० अमेरिकन डॉलर्समध्ये खरेदी करण्याचे ठरविले आहे.याबाबतच्या करारावर चालू महिन्याच्या अखेरपर्यंत एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत.स्टॅन्लो ही अमेरिकेतील दुसऱ्या  क्रमांकाची सर्वात मोठी रिफायनरी आहे.एस्सारकडून गुजरातमधील वाडिनार येथे २ लाख ८० हजार बॅरल प्रतिदिवस क्षमतेची रिफायनरी चालविली जाते. याशिवाय केनियामध्ये ९० हजार बॅरल प्रतिदिवस क्षमतेचा प्रकल्पही चालविला जातो.

Leave a Comment