पणजी, २१ मार्च – आपल्या विविध मागण्यांसाठी गोवा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने राज्यभरात ‘पेनबंद’ आंदोलनास सुरुवात केली आहे.मुख्यमंत्र्यांशी झालेली चर्चा फिसकटल्यानंतर आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला होता. होणारच असा निर्णय संघटनेने घेतला आहे.
‘समान काम, समान वेतन’ तसेच इतर अनेक मागण्यांवरून सरकारी कर्मचारी संघटनेने यापूर्वी अनेकदा संपाचा इशारा दिला होता. मात्र प्रत्येक वेळी चर्चेचे माध्यम पुढे करून संप पुढे ढकलण्यात राज्यातील कामत सरकार यशस्वी ठरले होते. यावेळी संघटना आपल्या मागण्यांशी ठाम राहिली असून मागण्या मान्य केल्याचा लेखी आदेश सरकारकडून जारी केल्याशिवाय मागे न हटण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. सध्या गोव्यात राज्य विधानसभा अधिवेशन सुरू असल्याने आधीच विविध प्रकरणांवरून विरोधकांचे लक्ष्य ठरलेल्या कामत सरकारला सरकारी कर्मचार्यांवचे हे आंदोलन महाग पडण्याची शक्यता आहे. राज्यात विविध खात्यांमध्ये काम करणाऱ्या एकाच दर्जाच्या कर्मचार्यां ना वेगवेगळ्या श्रेणी लावण्यात आल्या असल्याने सरकारी कर्मचारी संघटनेने समान काम समान श्रेणीची मागणी गेल्या बर्या च काळापासून लावून धरली होती.
गोवा : गोव्यात सरकारी कर्मचार्यांचे पेन बंद आंदोलन
गेल्या पाच वर्षापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या या घोळाबाबत तोडगा काढण्याच्या मागणीसाठी आतापर्यंत बरेच प्रयास संघटनेने घेतले आहेत. परंतु राज्यातील पूर्वीचे प्रतापसिग राणे सरकार व आताचे कामत सरकार यांनी केवळ आश्वासने देत वेळ मारून नेण्याचेच धोरण अवलंबिल्याने आता आश्वासने नकोत, लेखी आदेश (ऑर्डर) जारी करा, तरच आंदोलन मागे घेऊ! अशी मागणी संघटनेने केली आहे