‘रेक्सेल’चा भारतीय बाजारपेठेत प्रवेश

पुणे- रेक्सेल या जागतिक स्तरावरील आघाडीच्या उर्जा उपकरणांच्या वितरकांनी आज पुण्यातील यंत्र ऑटोमेशन्स बरोबर सहकार्य करार करत असल्याची घोषणा केली. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर रेक्सेल चे कंपनीत ७४ टक्के भांडवल असेल तर यंत्र चे २६ टक्के भांडवल असेल.
      
वेगाने वाढलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये भौगौलिक दृष्टया वाढ करण्याच्या रेक्सेलच्या योजनेच्या एक भाग म्हणून ही भागिदारी करण्यात येत आहे.
      
यावेळी बोलताना रेक्सेल एशिया पॅसिफिकचे मुख्य उपाध्यक्ष हर्बर्ट सॅल्मॉन यांनी सांगितले, ‘‘यंत्र ऑटोमेशन्स बरोबरच्या या भागिदारीमुळे रेक्सेल आता उच्च वाढीच्या आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर संधी असलेल्या भारतीय बाजारपेठेत ऑटोमेशन, कंट्रोल सिस्टम, विद्युत उपकरणे आणि सेवांच्या वितरणासाठी प्रवेश करत आाहे. यंत्र ऑटोमेशन्सच्या कौशल्याने तसेच ब्रॅन्डच्या माहितीमुळे आता ऑटोमेशन आणि कंट्रोल उत्पादनांचे वितरण हे रेक्सेल करता महत्वपूर्ण असेल व ते भारतीय बाजारपेठेतील आमचे पहिले पाउल असेल.’’

Leave a Comment