सोलापूर : जिल्हा परिषदेच्या भंगार गाड्यांचा २१ मार्चला लिलाव

सोलापूर १७ मार्च – गेल्या ३० वर्षापासून जिल्हा परिषद आवारात सडत असलेल्या गाड्यांच्या लिलावास अखेर मुहुर्त सापडला असून येत्या २१ मार्च रोजी या गाड्यांचा लिलाव होणार आहे.मागील ३० वर्षांपासून जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि पदाधिकारी यांची बंद पडलेली वाहने सडत होती.या अडगळीमुळे बरीच जागा व्यापली गेली होती.या बंद पडलेल्या वाहनात जि.प.चे लाखो रुपये अडकून पडले होते.

सदर वाहनांची विक्री करण्यासाठी शासनाची परवानगी घेणे गरजेचे होते. परंतू या वाहनांचा लिलाव कसा करायचा, परवानगी कोणाकडून घ्यावयाची याची माहिती जि. प. मधील एकाही अधिकाऱ्यास माहित नसल्याने गाड्यांच्या लिलावास उशीर झाल्याचे समजते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेंद्र सिह यांनी याबाबत पाठपुरावा करून शासनाची परवनागी मिळविली आहे. शासनाच्या धोरणानुसार लिलाव करण्यासाठी एका खाजगी एजन्सीला लिलावाचे काम देण्यात आले आहे. संपूर्ण राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या जुन्या वाहनांचा लिलाव करण्याचा ठेका या खाजगी कंपनीला देण्यात आला आहे.

Leave a Comment