सोलापूर : अक्कलकोटमधील अतिक्रमण न हटवल्यास आंदोलन

अक्कलकोट १७ मार्च – तीर्थक्षेत्र अक्कलकोटमधील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले असून मल्लिकार्जून मंदिराला वाहनांनी सदैव वेढा घातलेला असतो.शहरातील रस्त्यांची त्वरित दुरूस्ती व्हावी, अतिक्रमणे हटवावीत आदी मागण्यांसंदर्भात अक्कलकोट शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने अक्कलकोट नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांढना निवेदन देण्यात आले आहे.वेळोवेळी निवेदने देऊनही दखल घेण्यात आलेली नाही.या पार्श्वभूमीवर अतिक्रमण न हटवल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

अक्कलकोट शहरातील वागदरी रस्ता, शरण मठ, उदय चित्रमंदीर, कारंजा चौक, पॉवर हाऊस, बसस्थानक, स्टेशन रस्ता, एवन चौक, मंगरूळे प्रशाला, नवीन डाक बंगला, समता नगर, शिवपुरी आदी रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. वाहन चालविणे कठिण झाले आहे. परिसरातून पादचार्यां ना चालणेही मुश्किलीचे बनले आहे. धुळीचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांना श्वसनाचा, अर्धशिषी व्याधीचा व फुफ्फुसाचा त्रास होत आहे. यामुळे अक्कलकोट शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शहरातील अतिक्रमण मोहीम अर्धवट अवस्थेतच राबविण्यात आली आहे. अतिक्रमण हटविलेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी अक्कलकोट नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने काळजी घेतली नाही. पर्यायाने शहरात पुन्हा नव्या जोमाने अतिक्रमणे वाढली आहेत. ग्रामदैवत मल्लिकार्जून मंदिरास अनेक वाहनांचा गराडा असतो. यासंदर्भात अक्कलकोट शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने वेळोवेळी निवेदने दिली. पण याची कोणीच दखल घेत नाही. सदर निवेदनावर तालुका शिवसेना अध्यक्ष सोपान निकते, शहर अध्यक्ष स्वामीराव मोरे, विद्यार्थी सेनेचे मल्लीनाथ पाटील, श्रीशैल पाटील, शहर उपप्रमुख दत्ता आलोणे, खंडू कलाल, शाखा प्रमुख श्रीकांत शेडम, शिवसेना उपतालुका प्रमुख धनराज चव्हाण, प्रविण घाटगे आदींच्या स्वाक्षर्या  आहेत.

Leave a Comment