सार्वजनिक क्षेत्रातील ५४ कंपन्या तोटयात

मुबंई – एअर इंडिया, इस्टर्न कोलफिल्ड,भारत कुकिग कोल व स्कूटर्स इंडिया यांच्यासह सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल ५४ कंपन्यांना २००८-२००९ या आर्थिक वर्षी एकूण १४ कोटी ४ लाख २४ हजार रूपयांचा तोटा झाला.या कंपन्यांमध्ये एअर इंडियाला ५ हजार ५४८ कोटी २६ लाख तोटा झाला.या पाठोपाठ इस्टर्न कोलफिल्डस् या कंपनीला २ हजार १०९ कोटी ९ लाख रूपयांचा तोटा झाला.भारत कुकिग कोल या कंपनीला याच कालावधीत १ हजार ३८० कोटी ४७ लाख रूपयांचा तोटा झाला.हिंदुस्थान फोटो फिल्मस् मॅन्युफॅक्चरिंग ८९० कोटी रूपयांचा तोटा झाला.या कालावधीत तोटयात असलेल्या सार्वजनिक उद्योगातील कंपन्यांना झालेल्या एकूण तोटयापैकी वरील चार कंपन्यांना झालेले तोटयाचे प्रमाण एकूण तोटयाच्या ६९ टक्के होते तर उर्वरित ५० कंपन्यांना मिळून झालेल्या एकूण तोटयाचे प्रमाण एकूण तोटयाच्या ३१ टक्के होते.घडयाळाचे उत्पादन करणारी एचएमटी वॉचेस हिंदुस्थान शिपयार्ड व स्कूटर्स इंडिया या कंपन्याही तोटयात होत्या.

Leave a Comment