मोटारी महागणार

उत्पादन खर्चात झालेली भरमसाट वाढ मोटर कंपन्यांना परवडेनाशी झाली असल्यामुळे या वाढीव खर्चाचा भार ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय मोटर उत्पादक कंपन्यांनी घेतला आहे.होंडा जिएल कार्ज इंडिया या कंपनीने १ एप्रिलपासून आपल्या मोटारींच्या किमती २ ते ३ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.लवकरच फोर्ड व जनरल मोटर्स या कंपन्याही दरवाढ करणार आहेत.
      
निर्मिती खर्चात वाढ झाल्यामुळे होंडा मोटर्सने सेडन प्रकारातील अॅकॉर्ड या लक्सरी मोटरच्या किमतीत १ एप्रिलपासून २ ते ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे अन्य मोटर कंपन्यादेखील या महिन्याच्या अखेरपर्यंत किमती वाढविण्याचा विचार करतील. उत्पादन खर्चात झालेली वाढ देशातील सर्व मोटर कंपन्यांसाठी चितेची बाब असल्याचे मत फोर्ड इंडियाचे अध्यक्ष मायकल बोनहॅम यांनी व्यक्त केले. फोर्ड कंपनी मार्चच्या शेवटी किमती वाढविण्याबाबत विचार करीत आहे. जनरल मोटर्स इंडियाचे उपाध्यक्ष पी. बालेंदा्रन यांनीही परिस्थितीचा आढावा घेत आहोत असे सांगितले.

Leave a Comment