मुंबई : हर्षद मेहता घोटाळ्यात अडकलेले आयकर विभागाचे २ हजार कोटी रुपये वसूल

स्टेट बँकेची रक्कमही वसूल-मुंबई १७ मार्च – केंद्रीय अर्थमंत्रालयाद्वारे नियुक्त शेअर बाजार घोटाळ्याची चौकशी करणार्या१ कस्टोडियन विभागाने १९९२ साली झालेल्या हर्षद मेहता शेअर घोटाळ्यात अडकलेली सुमारे २ हजार १९६ कोटी रुपयांची थकीत बाकी आयकर विभाग आणि भारतीय स्टेट बँकेला सुपूर्द केली.सर्वोच्च न्यायालयाने १४ मार्च रोजी या प्रकरणाचा निकाल देताना मुंबई विशेष न्यायालयाचा परताव्यासंबंधीचा ‘‘जैसे थे’’ निर्देश खारिज करीत या दोन्ही संस्थांची बाकी त्वरित जमा करण्याचे आदेश दिले होते.या आदेशानुसार कारवाई करीत कस्टोडियन विभागाचे अधिकारी सतीश लुम्बा यांनी गुरुवारी मुंबईत आयकर विभागाला १९९५.६६ कोटी रुपये, तर स्टेट बँकेला १९९.२५ कोटी रुपयांची रक्कम अदा केली.

ही रक्कम अंतरिम स्वरुपात देण्यात आली असून विशेष न्यायालयांचे आदेश आल्यास संबंधित रक्कम परत घेतली जाईल, असा करारही करण्यात आला आहे. ही रक्कम दिल्यानंतर आयकर विभागाशी संबंधित आर्थिक व्यवहार संपुष्टात आले असल्याची माहिती लुम्बा यांनी पत्रकारांना दिली. याशिवाय व्याज किवा दंड स्वरुपातील रक्कम बाकी असल्यास तीही नंतर दिली जाईल. हर्षद मेहता शेअर घोटाळा प्रकरणातील एकूण ४ हजार ५०० कोटी रुपयांपैकी ४ हजार कोटी रुपये संबंधित संस्था किवा बँकांना वितरित करण्यात आले आहेत. यापैकी सर्वात मोठी रक्कम भारतीय स्टेट बँकेला देण्यात आली आहे.

शेअर बाजार आणि भांडवली बाजारात होणार्याे गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवणे आणि यासंबंधीचे खटले चालवण्यासाठी संसदेने १९९२ साली विशेष न्यायालयाची निर्मिती केली. या न्यायालयात प्रविष्ट खटल्यांविरोधात केवळ सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. या न्यायालयात असलेल्या खटल्यांमध्ये ‘हर्षद मेहता घोटाळा’ हे आजपर्यंतचे सर्वाधिक रकमेचे गैरव्यवहारांचे प्रकरण आहे.

Leave a Comment