मुंबई : सलमानवरील खटला तातडीने संपविण्याची मागणी

मुंबई दि १७ मार्च – भरधाव वेगाने मोटार चालवून एकाचा बळी घेतल्याच्या खटल्यातील आरोपी सिनेस्टार सलमान खान याच्यावरील खटला शक्यत तितक्या लवकर संपवावा,असा अर्ज फिर्यादी पक्षाने कोर्टाला सादर केला.गेली साडेआठ वर्षे हे प्रकरण प्रलंबित आहे.सप्टेंबर २००२ मध्ये लँड क्रुझर ही महागडी गाडी तूफान वेगाने चालवून सलमानने फूटपाथवर झालेल्या एका इसमाचा बळी घेतला होता.या भीषण अपघातात चौघेजण जखमी झाले होते.

सलमान दारुच्या नशेत गाडी चालवत होता, असे पोलिसांनी तक्रारीत नमूद केले होते. सलमानचा अंगरक्षक रवींद्र पाटील याने सलमान नशेत गाडी चालवत होता अशी साक्ष दिली होती. आपण त्याला गाडी चालवू नये असे सुचवले होते, परंतु त्याने आपले म्हणणे ऐकले नाही असेही पाटील याने सांगितले होते.  पाटील याचे २००७ मध्ये निधन झाले. सध्या जे आरोप सलमानवर ठेवण्यात आले आहेत ते सिद्ध झाल्यास त्याला जास्तीत जास्त २ वर्षे कैदेची शिक्षा होऊ शकेल. परंतु फिर्यादी पक्षाने सलमानवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ नुसार खटला चालवावा अशी विनंती न्यायालयाला केली आहे.

Leave a Comment