नागपूर : विदर्भात दोन शेतकर्यांतच्या आत्महत्या

नागपूर १७ मार्च – नापिकी आणि कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळे विदर्भात आणखी दोन शेतकऱ्यांनी  आत्महत्या केल्याचे गुरुवारी उघडकीस आले.यात अकोला व अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी एका शेतकर्याकचा समावेश आहे.पातूर तालुक्यातील तायवनी येथील २९ वर्षीय शेतकरी अनिल नागोराव शिदे यांनी विषारी औषध देऊन गुरुवारी आत्महत्या केली.त्यांच्यावर दीड ते दोन लाख रुपयांचे कर्ज होते.यावर्षी उत्पन्न कमी झाल्याने ते हवालदिल होते.त्यांनी शेतात जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.त्याच्या पश्चात गरोदर पत्नी, आई-वडील व दोन भाऊ आहेत.

अमरावती येथे नापिकी आणि वाढत्या महागाईमुळे संसाराचा गाडा चालविणे कठीण झाल्याने हतबल झालेल्या प्रवीण पंजाबराव काळे या शेतकर्याकने मंगळवारी गळफास लावून आत्महत्या केली. प्रवीण यांच्याकडे एक एकर कोरडवाहू शेती होती. ते स्वतः शेती पाहत होते. दरवर्षीच्या नापिकीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे प्रवीण यांना कठीण झाले होते. त्यामुळे महागाईच्या काळात कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, या चितेत ते होते. मंगळवारी गावातील दुकानातून नवीन दोरी खरेदी करुन विठ्ठलराव देशमुख यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

Leave a Comment