नागपूर : ग्रामगीता चितन महोत्सवाचा कस्तुरचंद पार्कवर समारोप

नागपूर १७ मार्च – जिल्हा परिषदेतर्फे आयोजित ग्रामगीता चितन महोत्सवाचा समारोप सोहळा शनिवार दि.२६ मार्च रोजी स्थानिक कस्तुरचंद पार्कवर सकाळी १० वाजता होत आहे.केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.यापूर्वी देशपांडे सभागृहात समारोपाचा कार्यक्रम होणार होता.यासंदर्भात नुकतीच एक बैठक झाली.त्यात महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन पदाधिकार्या सोबतच कर्मचारी संघटनेने केले होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित हा पहिलाच महोत्सव आहे. १२ मार्चपासून जिल्ह्यातील गावा-गावांमध्ये महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. त्यासाठी आठवड्याची दिनचर्या ठरवून देण्यात आली. त्यानुसार गावा-गावात आठवडाभर कार्यक्रम घेतले जात आहेत. यात व्याख्याने, भजन कीर्तनासह इतरही कार्यक्रम होत आहेत. समारोपाच्या कार्यक्रमाला पालकमंत्री शिवाजीराव मोघे, आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत, अर्थ राज्यमंत्री राजेंदा्र मुळक आदी उपस्थित राहणार असून उद्घाटन सोहळ्यानंतर भय्यूजी महाराज, लक्ष्मण नारखेडे, आचार्य हरिभाऊ वेरूळकर, बबनराव वानखेडे, पोपटराव पवार, सत्यपाल महाराज आदींचे प्रबोधन होईल.

Leave a Comment