जेडी पॉवर पुरस्कार लांबणीवर

जागतिक ऑटोमोबाईल उद्योगाने जपानमधील संकटांची गंभीर दखल घेतली असून परिणामी भारतातील अनेक कार्यक्रम यामुळे पुढे ढकलण्यात आले आहेत.जे.डी.पॉवर या मार्केट रिसर्च कंपनीच्या वतीने ऑटोमोबाईल उद्योगासाठी दिला जाणारा पुरस्काराचा वितरण समारंभ या आठवडयात आयोजित करण्यात आला होता तो पुढे ढकलण्यात आला आहे.जपानमधील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.कंपनीचे कार्यकारी संचालक मोहित अरोरा यांनी ही माहिती दिली.भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातही मूळ जपानच्या असणाऱ्या कंपन्यांतील काही जपानी कर्मचाऱ्यांचे नातेवाईक या नैसर्गिक आपत्तीचे बळी ठरले आहेत,अशी माहिती अरोरा यांनी दिली.जे.डी.पॉवर एशिया पॅसिफिक अॅवार्ड हा आशिया खंडासाठी असून आता समारंभ पुढील दोन महिन्यांमध्ये आयोजित करण्यात येईल.

Leave a Comment