जगातील सर्वाधिक मौल्यवान कुत्रा बनण्याचा मान : तिबेटीयन मास्टीफ कुत्र्याला

लंडन – चीनमध्ये तब्बल १० लाख पौंड किमत मिळविणाऱ्या तिबेटियन मास्टीफ कुत्र्याने जगातील सर्वाधिक मौल्यवान कुत्रा बनण्याचा मान पटकाविला असून एका चीनी कोळसा खाण मालकाने हा श्वान खरेदी केला आहे.
 
या संदर्भात टेलिग्राफने दिलेल्या रिपोर्टनुसा तिबेटियन मास्टीफ हा रखवालीसाठी वापरला जाणारा कुत्रा असून ती जगातील सर्वात जुनी जात असल्याचे मानले जाते. दंतकथांनुसार चेंगीझखान आणि भगवान बुद्ध यांच्याकडे हाच कुत्रा होता असे सांगितले जाते.
 
आजकाल हा कुत्रा पाळणे हे चीनमध्ये स्टेटस सिंबॉल झाले असून श्रीमंताचा कल या कुत्रा खरेदीकडे असतो. प्युअर चीनी ब्रीड म्हणून हा कुत्रा ओळखला जातो आणि तिबेटबाहेर तो क्वचितच आढळतो. पाच वर्षांपूर्वी ५ हजार युआन मध्ये हा कुत्रा मिळत असे आता मात्र त्यासाठी धनवान लोक अक्षरशः लाखो युआन खर्चायला तयार आहेत. १० लाख पौंडाना खरेदी करण्यात आलेला बिग स्प्लॅश याचे चीनी नामकरण हाँगडाँग असे असून तो ११ महिन्यांचा आहे. त्याची उंची तीन फूट असून वजन आहे ८१ किलो.
 
हा अस्सल जातीचा असल्याने त्याचा उपयोग ब्रिडींगसाठी करण्याचा त्याच्या मालकाचा मानस असून या कुत्र्यासाठी मोजलेली किमत ही गुंतवणूक असल्याचे त्याचे मत आहे. या कुत्र्याच्या प्रत्येक ब्रिडींगसाठी १ लाख युआन आकारण्याचा मालकाचा मानस असून या कुत्र्याची किमत वसुल होण्यास दोन वर्षे पुरेशी असल्याचेही या मालकाचे म्हणणे आहे.

Leave a Comment