घोडेव्यापारी हसन अलीला चार दिवसांची कस्टडी

नवी दिल्ली दि १७ घोडेव्यापारी हसन अलीच्या कस्टडीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला नकार आणि त्याची जामीनावर केलेली सुटका याला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली असून हसन अलीला चार दिवसांची कस्टडी दिली आहे.एनफोर्समेंट डायरेक्टरेटने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते त्याचा निकाल आज दुपारी दोन वाजता न्यायालयाने दिला.न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी आणि न्यायाधीश एस एस निजार यांच्या खंडपीठापुढे हे अपील करण्यात आले हते.

घोडे व्यापारी हसन अली याने त्याच्या रिअर इस्टेट, घोडे व्यापार, भंगार वितरण अशा अनेक व्यवसायात कमावलेला काळा पैसा स्वीस बँकेत ठेवला असल्याचा त्याच्यावर आरोप असून ही रक्कम आठ बिलीयन डॉलर्स इतकी आहे. त्यासाठी एनफोर्समेंट डायरेक्टरेटने हसनच्या चौकशीसाठी त्याला कस्टडी द्यावी अशी मागणी हायकोर्टात केली होती पण कोर्टाने ती फेटाळली होती.

Leave a Comment