अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक लढविणार नाही : अमेरिका राज्य सचिव हिलरी क्लिंटन

 कैरो – इजिप्तच्या दौऱ्यावर असलेल्या अमेरिकेच्या राज्य सचिव हिलरी क्लिंटन यांनी सीएनएन या दूरदर्शन वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले असून सेक्रेटरी ऑफ स्टेटची दुसरी टर्मही करण्याबाबत उत्सुक नसल्याचे सांगितले आहे.

हिलरी म्हणतात, सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणून मी जे काम करत आहे, त्यात पूर्ण समाधान आहे. हे काम करताना अनेक श्वास रोखून धरायला लावणार्याआ प्रसंगाचा सामना करण्याची वेळ आली. त्यात जशा दुःखकारक घटना होत्या तशाच आनंदाच्याही घटना होत्या. नैसगिक आणीबाणीचे हैती पासून जपानपर्यंतच्या प्रसंगाने अनेक अविश्वसनीय संधी सामोर्यात आल्या तशीच आव्हानेही पेलावी लागली. इजिप्त आणि आसपासच्या परिसरात हाच अनुभव आला. दुसरी टर्म करण्याची इच्छा नसली तरी अमेरिकेच्या हितासाठी आवश्यक ते कांहीही करण्यात आपल्याला नेहमीच आनंद असून आमच्या देशाची मूल्ये, आदर्श, सुरक्षा जपण्यासाठी सर्व ते आपण करणार आहोत. आणखी दोन वर्षे आपल्याला हे काम करण्याची संधी आहे आणि त्याचा पुरेपुर वापर करण्याकडे आपला कल राहील असेही त्या यावेळी म्हणाल्या.

२००८ सालात अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रचाराचा अनुभव फारच चांगला होता असे सांगून त्यांनी लोकांनी दिलेल्या पाठिब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

लाहेार येथे सीआयए एजंट डेव्हीड याने केलेल्या गोळीबारात ठार झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना अमेरिकेने  नुकसान भरपाई दिल्याच्या वृत्ताचा इन्कार करून त्या म्हणाल्या की पाकिस्तान सरकारशी अमेरिकेचे नाते दृढ असून यापुढेही ते तसेच राहील. अमेरिकेच्या निर्णयांचा पाकिस्तानी सरकारने केलेल्या स्वीकाराबद्दल त्यांनी पाकिस्तान सरकारचे आभार मानले.

Leave a Comment