सोलापूर १७ मार्च – सोलापूर – हैदराबाद रस्त्यावर बोरामणीजवळ ट्रकला धडकून मोटारसायकलवरील दोघेजण ठार झाले.बुधवारी मध्यरात्री घडला.किरण मारूती सावंत आणि चंद्रकांत रमेश पाटील अशी मृतांची नावे आहेत.हे दोघेजण एम.एच.१३ए.ई २५४४ या मोटारसायकलवरून सोलापूरहून इटकळकडे जात असताना बोरामणीजवळील ब्रह्मदेव मंदिरासमोर रस्त्यावर बंद पडलेल्या वाळूच्या ट्रकला पाठीमागून धडकले.
सोलापूर रस्त्यात बंद पडलेल्या ट्रकला धडकून मोटारसायकलवरील दोघे ठार
सदर अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी सूर्यकांत सावंत यांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. यातील किरण सावंत हा पुण्यात टमटम रिक्षा चालवत होता. तो सोलापूरला इंटरसिटीने बुधवारी रात्री आला, त्याला घेऊन जाण्यासाठी चंद्रकांत पाटील हा त्याची मोटारसायकल घेऊन आला होता. ते दोघेजण मोटारसायकलवरून इटकळकडे जात असताना हा अपघात घडला.