मुंबई : थॉमस प्रकरणावरुन विधिमंडळात तिसऱ्या दिवशीही गोंधळ

मुंबई १६ मार्च – केंद्रीय दक्षता आयोगाचे तत्कालीन आयुक्त पी.जे.थॉमस यांच्या नेमणूक प्रकरणावरुन बुधवारी तिसर्यां दिवशीही विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला.यामुळे कामकाज दोनदा तहकूब झाले.या प्रकरणात मुख्यमंत्री योग्यवेळी स्पष्टीकरण देतील,असे संसदीय कार्यमंत्र्यांनी सभागृहात सांगताच विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आक्षेप घेतला.आम्हाला किती दिवसात स्पष्टीकरण मिळेल, असा सवाल करीत विरोधकांनी गदारोळ घातला.अखेर येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपले म्हणणे मांडतील,असे संसदीय कार्यमंत्र्यांनी सांगितले. याला उपमुख्यमंत्री पवार यांनी पुष्टी दिली.

बुधवारी सकाळी अकरा वाजता विधानसभेचे कामकाज सुरू झाले. प्रश्नोत्तराचा तास संपताच संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या दालनात थॉमसप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी द्यावयाच्या स्पष्टीकरणाबाबत सर्व गटनेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री योग्यवेळी स्पष्टीकरण देतील, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर संतप्त विरोधकांनी एकच गदारोळ केला. आम्हाला कधी स्पष्टीकरण देतील ते सांगा, असा आग्रह खडसे यांनी धरला. यामुळे प्रथम अर्धा तासासाठी तर दुसर्यांरदा एक तासासाठी असे दोनदा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. दुपारी २.४५ वाजता सभागृहाचे कामकाज सुरु होताच मुख्यमंत्री दोन दिवसांत स्पष्टीकरण देतील, असे संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. याला उपमुख्यमंत्री पवार यांनी पुष्टी देवून दोन दिवसात मुख्यमंत्री निवेदन करतील असे सांगितले.

Leave a Comment