मुंबई : अब्जाधिश गुंतवणूकदार वॉरेन बफेट पुढील आठवड्यात भारतात

मुंबई १६ मार्च – अब्जाधिश गुंतवणूकदार वॉरेन बफेट हे पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येत आहेत.बफेट यांची बर्कशायर हाथवे कंपनी भारतात विमा विक्रीच्या अनुषंगाने नवे पोर्टल सरु करीत आहे.तसेच नवी दिल्लीत विमाधारकांच्या एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी बफेट हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील.चालू महिन्याच्या सुरुवातीला बार्कशायर हाथवेने बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्ससोबत एक करार करीत भारताच्या विमा क्षेत्रात पदार्पण केले होते.

बार्कशायर इंडियाकडून सर्वसाधारण विमा उत्पादनांचे वितरण बार्कशायरइन्शुरन्स डॉटकॉम या वेबसाईटवर केले जाईल. २५ मार्च रोजी या अनुषंगाने विमाधारकांच्या एका बैठकीचे आयोजन नवी दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. यावेळी विमाधारकांना आपल्या नावाची नोंदणी करता येईल. काही मोजक्या लोकांना या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. फोर्ब्सच्या २०११ मधील यादीनुसार वॉरेन बफेट हे जगातील तिसर्याल क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. २१ मार्च रोजी ते दक्षिण कोरियाला जात असून २२ मार्च रोजी जपानमधील एका कार्यक्रमास हजर राहणार आहेत. 

Leave a Comment