नागपूर : राज्याच्या पिछेहाटीच्या विपन्नावस्थेवर श्वेतपत्रिका प्रकाशित करण्याची मागणी

नागपूर १६ मार्च – राज्यातील काँग्रेस आघाडी सरकार सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत असताना महाराष्ट्राची विक्रमी पिछेहाट झाली आहे. या पिछेहाटीच्या विपन्नावस्थेवर सरकारने श्वेतपत्रिका प्रकाशित करावी अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी केली आहे.

आर्थिक विपन्नावस्थेमुळे व कमाईपेक्षा खर्च जास्त असल्यामुळे तसेच २ लाख ४० हजार कोटींच्या कर्जाचे व्याज भरताना आर्थिक त्रुटीमुळे राज्य दिवाळखोरीच्या वाट्यावर आले असून राज्याची ही आर्थिक परिस्थितीत चितेचा विषय ठरली आहे. या विक्रमी पिछेहाटीवर सरकारने श्वेतपत्रिका प्रकाशित करावी अशी मागणी त्यांनी केली. सरकार लोकांच्या खिशातून गेल्या वर्षापेक्षा २० टक्के जास्त कर वसूल करुनही आपले उत्तरदायित्व पूर्ण करण्यास विफल झाले आहे. सरकारचा आर्थिक तोटा या अर्थसंकल्पात विक्रमी होणार असल्याचा इशारा तिवारी यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गेल्या ४ महिन्यापासून समस्या समजून घेत आहे. मात्र कोणताही लोककल्याणकारी निर्णय त्यांनी घेतलेला नाही असा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्र्याच्या अधिकारात असलेले सर्व निर्णय अज्ञात असल्यामुळे ते मंत्रालयात प्रलंबित आहे. राज्यात नोकरशाही व नियंत्रण नसलेले मंत्री राजरोषपणे भ्रष्टाचार करीत असून हे सरकार नियंत्रण ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यावर २ लाख ४० हजार कोटी कर्जाचे ओझे, सर्व योजनांमध्ये होणारा भ्रष्टाचार हा तर घटनेने दिलेल्या अधिकारात केंद्र सरकारकडून आदिवासी दलित व समाज कल्याण निधीचा दुरुपयोग सरकारला विकासापासून दूर नेत आहे, अशी टिकाही त्यांनी केली आहे.

Leave a Comment