नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेकडून रेपो, रिव्हर्स रेपो दरात वाढ होण्याची शक्यता

नवी दिल्ली १६ मार्च – रिझर्व्ह बँकेची गुरुवार दि.१७ मार्च रोजी तिमाही पतधोरण आढावा बैठक होत असून या बैठकीदरम्यान रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ केली जाण्याची शक्यता आहे.वाढती महागाई, औद्योगिक उत्पादनात होत असलेली घट तसेच क्रूड तेलाचे चढे दर यामुळे पतधोरणात हस्तक्षेप केला जाण्याची दाट शक्यता आहे,असे अर्थतज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ केली जाऊ शकते, असे स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य वित्त अधिकारी हेमंत कॉन्ट्रक्‍टर यांनी सांगितले. खाद्यान्नाच्या दरात बर्यांपैकी घट झाली असली तरी सध्या हा अजूनही १० टक्क्यांच्या आसपास आहे. जानेवारी महिन्यातील औद्योगिक उत्पादन दर १६.७ टक्क्यांच्या तुलनेत घसरुन ३.७ टक्क्यांवर आला आहे. विद्यमान परिस्थिती लक्षात घेतली तर पतधोरणात लवचिकता बाळगणेच जास्त आवश्यक असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे.

Leave a Comment