ठाणे : गतीरोधक कामासंदर्भात महासभेची दिशाभूल

ठाणे दि १६ मार्च – ठाणे महानगरपालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी १ कोटी रूपये खर्च करून बसविण्यात येणाऱ्या गतीरोधकांच्या कामासंदर्भात महासभेची दिशाभूल करण्यात आली असून त्यासंदर्भात सखोल चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे ठाणे जिल्हा प्रमुख सल्लागार चंद्रहास तावडे यांनी केली आहे. ठामपतर्फे शहरातील विविध रस्त्यावर २३२ गतिरोधके बसविण्याबाबत निर्णय झाला असून त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. २३२ पैकी पहिल्या टप्प्यात ५२ ठिकाणी जुने आयआरसी मानकाप्रमाणे नसणारे गतिरोधक बदलून त्याठिकाणी नवीन तसेच दुसऱ्या टप्प्यात १८० नवीन ठिकाणी हे गतिरोधक बसविण्यात येणार आहे.

गतिरोधकांच्या कामासंदर्भात गेल्यावर्षी महासभेत निर्णय घेण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या कार्यालयीन गोषवार्यावत गतिरोधकांसाठीची यादी ठाणे शहर पोलिस वाहतूक शाखेने कळविल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात चंद्रहास तावडे यांनी महिती अधिकारात घेतलेल्या माहितीत प्रत्यक्षात वाहतूक पोलिस विभागाने गेल्या वर्षभरात अशी कोणतीही यादी दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment