मुंबई १६ मार्च – मॅकडॉनल्डस् इंडिया या आघाडीच्या फूड रिटेल व एचसीएल इन्फोसिस्टम लिमिटेड या हार्डवेअर कंपनीने नवीन ऑफर आणली आहे. सदर ऑफरमुळे मुलांना शिक्षण घेणे अतिशय आनंददायी होणार आहे. यामुळे विद्यार्थी पुस्तके व फळयाशिवाय शिक्षण घेवू शकतील.
मुंबई : एचसीएल व मॅकडॉनल्डची नवीन ऑफर
ऑफरअंतर्गत एचसीएल एमई किड्स एज्युकेशनल लॅपटॉपवर शिकण्याची संधी मुलांना मिळेल. मॅकडॉनल्डस्ने एचसीएल इन्फोसिस्टमबरोबर यासाठी सहकार्य केले आहे. एचसीएल एमई किड्स एज्युकेशनलने लॅपटॉप जिकण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. याकरिता मुलांना त्यांच्या आवडीचे एअरटॉप हॅपी मिल खरेदी करावे लागेल. त्यानंतर त्यांना एक कूपन दिले जाणार असून त्यावर असलेल्या सोप्या प्रश्नांची उत्तरे त्यांना उत्तर, नाव व शहराची पहिली तीन अक्षरे अशा स्वरुपात ५६७६७ वर एसएमएस करायची आहेत.