औरंगाबाद : बीसीएसच्या एकाच विषयाच्या दोन प्रश्नपत्रिका दिल्याने गोंधळ

औरंगाबाद १६ मार्च – विद्यापीठाच्या पदवी परीक्षा सुरू झाल्या असून त्यामध्ये शासकीय कला व विज्ञान महाविद्यालयात बीसीएसला एकाच विषयाच्या दोन प्रश्नपत्रिका दिल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला.आधी जी प्रश्नपत्रिका दिली होती ती अभ्यासक्रमाच्या बाहेरची होती.विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर अभ्यासक्रमावर आधारित दुसरी प्रश्नपत्रिका देण्यात आली.मात्र या प्रश्नपत्रिकेवर विद्यापीठाचा नामोल्लेखही नव्हता. ही प्रश्नपत्रिका अधिकृत आहे काय, असा विद्यार्थ्यांना प्रश्न पडला.याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा प्रमुखांना विचारले असता त्यांना याबाबत काहीच माहिती नव्हती.याबाबत अहवाल आल्यावर कारवाई करू असे उत्तर त्यांनी दिले.

Leave a Comment