राज्यपालांना मराठी बोलण्याचे आवाहन

राज्यपाल शंकर नारायणन् यांचे मध्यवर्ती सभागृहात दुपारी एक वाजता आगमन झाले. राज्यपालांनी आपल्या अभिभाषणास सुरुवात करताच अभिभाषण मराठीत करा ! असे शिवसेनेने राज्यपालांना आवाहन केले आणि आपला आक्रमकपणा दाखवून दिला. नमस्कार ! म्हणून  राज्यपालांनी आपले भाषण इंग्रजीत वाचण्यास प्रारंभ करतात शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते दिवाकर रावते उठून उभे राहिले. महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे. पण महोदय आपली मातृभाषा नसल्याने आम्ही बाकावर न बसता जमिनीवर बसत आहोत, असे सांगून जमिनीवर बसकन मारली. यावेळी शिवसेनेचे विधानसभा गटनेते सुभाष देसाई यांच्यासह सर्वच शिवसेनेच्या आमदारांनी खाली बसणे पसंत केले. यावेळी मनसेचे आमदार राज्यपालाचे अभिभाषण ऐकत होते, त्यांनी याला पाठींबा दिला नाही.

Leave a Comment