मुंबई : वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छांवर खर्च न करता ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यावी – चव्हाण

मुंबई १५ मार्च – वाढदिवस साधेपणाने साजरा व्हावा, अशी आपली इच्छा असून त्यादिवशी कोणीही पुष्पगुच्छ आणू नयेत, तसेच बॅनर्स, होर्डिंग्ज उभारु नयेत. त्याऐवजी त्यावर होणारा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी द्यावा. शक्य असेल तेथे वृक्षारोपणासारखे पर्यावरणपूरक कार्यक्रम करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

वाढदिवसानिमित्त हितचितक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने पुष्पहार, पुष्पगुच्छ आदीच्या माध्यमातून अभिनंदन करतात. यासंदर्भात आपल्या आवाहनात चव्हाण म्हणतात की, माझ्या हितचितकांच्या भावनांचा माी आदर करतो. तथापि पुष्पगुच्छ खरेदी करणे हे एकप्रकारे अनाढायी असते. बॅनर व होर्डिंग्जमुळे शहरे विदा्रूप होतात. वाहतुकीला अडथळे निर्माण होतात आणि पर्यावरणाचेही नुकसान होते. ज्या-ज्या ठिकाणी वृक्षारोपणासारखे कार्यक्रम शक्य आहेत, तेथे ते आयोजित करुन पर्यावरण संरक्षणास मदत करावी. माझ्या या भावनांची सर्व हितचितक व कार्यकर्ते नोंद घेतली, अशी अपेक्षाही चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment