पुणे : पद्मविभूषण, कथ्थकक्वीन सितारादेवी यांना जीवनगौरव पुरस्कार

पुणे १५ मार्च – १० व्या शनिवारवाडा नृत्यमहोत्सवात पद्मविभूषण सितारादेवी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी शनिवारवाडा नृत्य महोत्सवाच्या अध्यक्षा सबिना संघवी, ज्येष्ठ नृत्यांगणा मनीषा साठे, नीलम शेवलेकर, पारुल मेहता, गायत्रीदेवी पटवर्धन, वर्षा चोरडिया, जयश्री शहाडे, रेखा कृष्णन, सुर्योदय एड्स फाऊंडेशनचे पुनीत बालन, सितारादेवी यांची कन्या जयंतीमाला व नात रिषिका मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

५१ हजार रु. रोख, मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. शनिवारवाडा महोत्सवातर्फे या वर्षापासून प्रथमच जीवनगौरव पुरस्कार देण्यास सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ नृत्यांगणा मनिषा साठे यांनी मानपत्राचे वाचन केले. रेडिओ जॉकी सुभव यांनी सूत्रसंचालन केले. प्रख्यात नृत्यांगणा रोशन दाते व सहकार्यांभनी कथ्थक विविधा सादर करुन कार्यक्रमास सुरुवात केली. कथ्थक गुरु रोहिणी भाटे यांच्या जेष्ठ शिष्या रोशन दाते यांच्या संस्थेतील कलाकारांनी प्रथम पारंपारिक गणेशवंदना सादर केली. यानंतर महाराष्ट्रातील कैलास लेणे, घारापुरी, औंढा नागनाथ, मार्व्हज, अंबरनाथ, गोंदेश्वर आदी भव्य मंदिरातील शिवाच्या असंख्य मूर्ती म्हणजे शिव तांडवाचा नृत्यविष्कार शिव-तांडवद्वारे सादर केला. यानंतर महाराष्ट*ाचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा सादर करणारा नृत्यरुपी पोवाडा सादर करण्यात आला.

Leave a Comment