नवी दिल्ली : सुरेश कलमाडींची पुन्हा सीबीआय चौकशी

नवी दिल्ली १५ मार्च – राष्ट्रकूल स्पर्धा आयोजन समितीचे निलंबित अध्यक्ष सुरेश कलमाडी यांची सीबीआयने मंगळवारी पुन्हा चौकशी केली.खेळांच्या आयोजनादरम्यान भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांची सीबीआय चौकशी करीत आहे.स्वीस कंपनीबरोबर १०७ कोटी रुपयांचा करार करताना घोटाळा करण्यात आल्याचा आरोप कलमाडी यांच्यावर करण्यात आला आहे.

यापूर्वी जानेवारी महिन्यात सीबीआयने सुरेश कलमाडीची चौकशी केली होती. खेळांच्या आयोजनात कोणताही भ्रष्टाचार केला नसल्याचे कलमाडी वारंवार सांगत आले आहेत. कलमाडीच्या जवळच्या साथीदारांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा आयोजन समितीचे माजी महासचिव ललित भनोट, पूर्व महानिर्देशक व्ही. के. वर्मा, कलमाडीचे खाजगी सहायक शेखर देवरुखकर यांचा समावेश आहे. सीबीआयने भ्रष्टाचार केल्याप्रकरणी एकूण आठ गुन्हे दाखल केले आहेत.

Leave a Comment