मुंबई : आता डॉक्यूमेंट सेव्ह करण्याची गरज नाही

मुंबई १४ मार्च मायक्रोसॉफ्ट वर्डवर काम करीत असताना ज्यावेळी आपण एखादी नवीन फाईल ओपन करतो, त्यावेळी तिला काहीतरी नाव देऊन सेव्ह करावेच लागते. त्यानंतरही मजकूर टाईप करीत असताना अधूनमधून कंट्रोल एस दाबून मजकूर सुरक्षित करावा लागतो, नाहीतर हा मजकूर नष्ट होण्याचा धोका असतो. आता अशी झंझट करण्याची आवश्यकता नाही. वीज गेल्यावर किवा संगणक हँग झाल्यावरही आपली मेहनत वाया जाणार नाही.

गुगलने आता मायक्रोसॉफ्ट अॅप्लिकेशनसाठी एक खास क्लाऊड कनेक्ट टूलबार लाँच केला आहे. या टूलबारवर एमएस वर्ड, एक्सेल किवा पॉवरपॉईंट अॅप्लिकेशनमध्ये इनबिल्ट करण्यात आले आहे. यामुळे आपल्याला वारंवार सेव्ह करण्याची गरज उरणार नाही. हा टूलबार फ्री डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. या टुलबारच्या मदतीने युजर जगात कोठेही असला तरी कोणत्याही मशिनमधून थेट आपल्या एमएस ऑफिससाठी डेटा गुगलच्या सर्व्हर फॉर्मवर सेव्ह करु शकतो. मायक्रोसॉफ्टच्या एकूण ६२ अब्ज डॉलर्सच्या विक्रीत एमएस ऑफिसची भागीदारी एक तृतीयांश इतकी आहे. जगभरातील अधिकांश युजर एमएस वर्डचा वापरत करतात. त्यामुळे हे अॅप्लिकेशन जर यशस्वी झाले तर गुगलला एमएस ऑफिसच्या मोठ्या नेटवर्कचा फायदा होवू शकेल.

Leave a Comment