कुबेर गेला तुरुंगात

 कुबेर म्हणजे संपत्तीचा देव. तो खरोखर अस्तित्वात आहे की नाही, याविषयी वाद होईल. परंतु आपण या मर्त जगामध्ये ज्याच्याकडे भरपूर पैसा असतो त्यालाच कुबेर असे म्हणतो. या पृथ्वीतलावर खराच कुबेर कोणी असेल तर त्याच्याकडे किती पैसा असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. मात्र सध्या देशात ज्याच्या संपत्तीची चर्चा सुरू आहे त्या हसन अली खानची संपत्ती पाहिली म्हणजे खराच जर कोणी कुबेर असेल तर तो ती संपत्ती बघून अक्षरशः चकित होऊन जाईल. या कुबेराची आताची संपत्ती पाहिली तर ती महाराष्ट* शासनाच्या एकंदर अर्थव्यवस्थेएवढी आहे. ही संपत्ती ज्ञात आहे. त्याची अज्ञात संपत्ती अजून किती? आणि ती कोणाच्या एवढी असेल हे तर कोणीच सांगू शकत नाही. मात्र न्यायालया समोर सारे सारखे हे लोकशाहीतले एक तत्व असे काही विचित्र आहे की, त्या तत्वामुळे हा लक्ष्मीचा लाल मऊ मऊ गाद्यांच्याऐवजी आता कारागृहाच्या थंड फरशीवर झोपलेला आहे. त्याच्या तपासात त्याने शस्त्रांचा अवैध व्यापार केल्याचेही आढळले असून त्यामुळे त्याला आता दहशतवाद विरोधी कायद्याखाली अडकवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार त्याच्यावर दहशतवाद विरोधी कायदा लागू झाला तर तो कदाचित कायमचाच तुरुंगाचा रहिवासी होईल. पैसा आणि आराम यासाठी चटावलेला एखादा माणूस किती वहावत जातो आणि त्याची हालत काय होते याचे हे चांगले उदाहरण आहे. अशी हालत अजून कोणा कोणाची होतेय याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  आपल्या दुर्दैवाने असे लोक या देशात आहेतही. सत्तेवर असताना मनमानी पैसा लुटणार्याह या लोकांनी याचा हिशेब कधी द्यावाच लागणार नाही असे समजून पैशाची लयलूट केली आहे. त्यांना आता हिशेब द्यावे लागत आहेत. 
            
भारतातला सर्वात मोठा करबुडव्या हसन अली खान याला जेरबंद केले गले आहे. खरे तर त्याच्या काळ्या पैशाचा छडा जानेवारी २००७  मध्ये लागला होता. पण आजवर तो मोकळाच हिडत होता. त्याला कोणी अटक करीत नव्हते कारण त्याने सर्वांनाच विकत घेतले होते. त्याच्या संपत्तीचा अजूनही पुरता छडा लागलेला नाही पण काही स्विस बँकांत त्याचे आठ अब्ज डॉलर्स असल्याचे अधिकृतपणे समजले आहे. आठ अब्ज डॉलर्स म्हणजे आठशे कोटी डॉलर्स म्हणजे ३६ते ४० हजार कोटी रुपये. एवढ्या रकमेवरचा आयकर त्याने भरलेला नाही. सरकारने त्याच्यावर ५० हजार कोटी रुपये आयकर आकारला असून त्याची वसुली करण्यासाठी त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने कमावलेला पैसा त्याच्या उत्पन्नाच्या ज्ञात  स्रोतांपेक्षा किती तरी जास्त आहे. त्यामुळे या पैशांसंबंधी चौकशी सुरू आहे. त्याच्याकडे किती पैसा असला तरी त्याच्यावर सर्वोच्य न्यायालयाची वक्रदृष्टी होताच त्याला कारागृहात पडावे लागले आहे. तिथे पैशाचा काही उपयोग नाही. त्याचा अपराध २००७ साली उघडकीस आला असतानाही त्याला आजवर अटक का करण्यात आली नाही असा सवाल न्यायालयाने विचारला आहे. खरे तर याचे उत्तर अगदी उघड आहे.
 
त्याच्या संपत्तीचा प्राथमिक अंदाजच काही हजार कोटी रुपये इतका आहे. एखादा पोलीस कोणाचे वॉरंट बजवायला जातो तेव्हा त्याला शंभर रुपये दिले की,  आरोपी सापडला नाही असे खोटे कारण सांगून परत येतो. २००७ सालपासून हसन अली खान याला असे शे पाचशे रुपये देऊन पोलिसाची बोळवण करणे काय अवघड आहे का ? २००७ सालपासून अटक वॉरंट  टाळण्यासाठी हसन अली खान होण्याचीही गरज नाही.  कोणी गावगन्ना पुढारी किवा गुंड हे करू शकतो. मग ते खान याने केले असेल तर त्यात नवल ते काय  ? त्याने खालपासून वरपर्यंत सारी यंत्रणाच गुलाम करून टाकली असेल तर त्यावर त्याची इतकी कमी रक्कम खर्च होणार आहे की जी रक्कम त्याच्या इस्टेटीच्या  ०.०१ टक्काही नसेल.  आपल्या देशातले सर्वोच्य न्यायालयाचे न्यायमूर्ती तरी विकावू नाहीत म्हणून अली खान आता तुरुंगात आहे. मात्र न्यायालय त्याच्या अटकेविषयी काही तरी विचारते आणि खानला लागलीच दुसरे दिवशी अटक होते याचा अर्थ काय ? हसन अली खान याने आपला उद्योग भंगार विकणे असा दाखवला आहे आणि आपले उत्पन्न वर्षाला ३० लाख रुपये असल्याचे म्हटले आहे पण नंतर त्याने घोड्यांच्या शर्यतीत लक्ष घातले आणि नंतर या निमित्ताने तो परदेशी प्रवास करायला लागला.
 
तिथे त्याला कुबेर होण्याचे काही मार्ग सापडले आणि त्यावर त्याने आपल्या भंगार दुकानाचे शटर खाली ओढले ते कायमचेच. मग त्याने एवढा पैसा कोठून कमावला असावा याबाबत सर्वांनाच कुतुहल आहं. हवाला  रॅकेट, शस्त्रांच्या खरेदी विक्रीतली दलाली, दहशतवादी कारवायांत सहभागी होऊन नशिले पदार्थ विकणे तसेच दारुची विक्री अशा मार्गांनी त्याला पैसा मिळालेला असावा असे तर्क केले जात आहेत. कशाचा कशाला पत्ता लागत नाही कारण तो तर आपल्याकडे एवढा पैसा आहे हेच नाकारत आहे.

पैशाचा आणखी एक मार्ग त्याने हाताळला असावा असे अंदाज आहेत. त्यानुसार हे पैसे त्याच्या नावावर असले तरीही ते आपल्या देशातल्या काही पुढार्यां नीच त्याला परदेशात नेऊन ठेवण्यासाठी दिले असावेत. हसन अली खानचा जागतिक कीर्तीचा शस्त्रास्त्र दलाल अदाना खशोगी याच्याशीही  संबंध आहेत आणि त्याच्यामुळे खानला काही व्यवहारात दलाली मिळाली आहे. मंत्र्यांचा आणि पुढार्यांाचा एवढा एकनिष्ठ सहकारी म्हणून काम करीत असल्याने त्याला अशी काही कंत्राटे मिळाली आहेत की ज्यांच्यातून त्याला कोट्यवधींची कमाई झाली आहे. पण एवढा मोठा अब्जाधीश माणून सध्या जेलच्या थंड फरशीचा लाभ घेत आहे.

Leave a Comment