मुंबई : स्तन कॅन्सरला नसते वयाची कोणतीही मर्यादा

मुंबई ८ मार्च – पुजा (बदललेले नाव) या २५ वर्षीय युवतीला आपल्या स्तनामध्ये बर्यालच दिवसांपासून गाठ जाणवत होती.ती आपल्या नेहमीच्या गायनाकॉलॉजिस्टकडे गेली असता डॉक्टरने तिला सोनो-मॅमोग्रामसह इतर काही चाचण्या करुन घेण्यास सांगितले.चाचण्या घेऊनही नेमके निदान होत नव्हते आणि इतक्या लहान वयात स्तनाचा कॅन्सर होण्याचे कारणही नव्हते. नंतर पुजाने कॅन्सरतज्ज्ञाची मदत घेण्याचे ठरविले. एशियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कॉलॉजीमधील कॅन्सरतज्ज्ञांची तिने भेट घेतली असता तेथील डॉक्टरांना कॅन्सररहित गाठ असावी, असा संशय आला. सुमारे एका आठवड्यानंतर त्यांनी लंपेक्टोमी नावाची चाचणी घेतली आणि काही पेशी फ्रोजन ऑटोप्सीसाठी पाठविण्यात आल्या. यानंतर कोणता रिझल्ट आला असेल.

होय अगदी धक्कादायक असा स्तन कॅन्सरची गाठ असल्याचा रिझल्ट आला होता. २५ वर्षीय युवतीच्या स्तनात कर्करोगाची गाठ होती. इतक्या कमी वयात स्तन कॅन्सरची गाठ असल्याचे पाहून डॉक्टरांनादेखील धक्का बसला होता. शस्त्रक्रिया केल्यानंतर पुजाला अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागले. आठवेळा केमोथेरपीची उपचार केल्यानंतर तिला रॅडिएशन थेरपीला सामोरे जाण्यास सांगण्यात आले. अचानक घडलेल्या या घडामोडींमुळे पुजावर संकटाचा डोंगरच कोसळला. केमोथेरपी केल्यानंतर एक आठवडा तिला अॅसिडिटीचा त्रास झाला तसेच मोठ्या प्रमाणावर थकवा जाणवला. तिचे वजनही कमी झाल्याचे डॉक्टरांना दिसून आले. जंक फूडपासून अलिप्त राहण्यास तिला डॉक्टरांनी सांगितले. तसेच खाण्या-पिण्याची पथ्ये आखून देण्यात आली. अॅनिमिया होऊ नये, यासाठी लोहाच्या गोळ्या देण्यात आल्या. सप्लीमेंटसाठी काही लाईफ लाँग गोळ्या देण्यात आल्या. पुजाने आपल्या अनुभवानंतर नियमीतपणे स्तनांची तपासणी करुन घेण्याचा सल्ला समाजासाठी दिला आहे. तुमचे वय कितीही कमी असले तरी स्तनामध्ये जाणवणार्याल छोट्यातल्या छोट्या गाठीकडे किवा दुखण्याकडे दुर्लक्ष करु नका, असे ती सांगते. तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर तुमच्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेऊ शकतात, त्यामुळे डॉक्टर आणि देवावर विश्वास ठेवा, असे ती म्हणते.

पुजाचे उदाहरण हे समाजातील केवळ एक उदाहरण आहे. युवा अवस्थेत स्तनाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण अतिशय झपाट्याने वाढलेले आहे. युवा अवस्थेमध्ये स्तनांच्या पेशी या दाट असतात आणि त्यामुळेच कॅन्सरची गाठ शोधून काढणे कठीण जाते. जोपर्यंत कॅन्सरचा तपास लागत नाही, तोवर तिची स्थिती अंतीम अवस्थेला पोहोचलेली असते. युवा महिलांमधील कॅन्सर हा आक्रमक असतो आणि तो कोणत्याही उपचाराला सहजासहजी प्रतिसाद देत नाही. अनेक महिलांना आपण खूप युवा असल्याचे आणि आपल्याला हा कॅन्सर होऊ शकत नसल्याचे वाटते. त्यामुळे गाठ किवा अन्य बाबींकडे त्या सपशेल दुर्लक्ष करतात. स्तनाच्या रोगाबाबत नॉन – कॅन्सरस वैयक्तिक इतिहास असू शकतो किवा कुटुंबाद्वारे हा रोग येऊ शकतो (आई, बहीण किवा मुलगी). अनुवांशिक दोष – बीआरसीए १ किवा बीआरसीए २ स्पेसिफिक जीन म्युटूएशन. गेल इंडेक्स स्कोअर – किमान गेल इंडेक्स स्कोअर १.७ टक्के (गेल इंडेक्समध्ये वय, कुटूंब, स्तर कॅन्सरचा इतिहास, पहिली मासिक पाळी होतानाचे वय, पहिले बाळंतपण, आणि ब्रेस्ट बायोस्पी यांचे विश्लेषण करुन आगामी पाच वर्षांच्या कालावधीत स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता तपासली जाते). इतर कारणांमध्ये जाडपणा, दारुचे जास्त प्रमाणात सेवन, तांबडे मटण जास्त खाणे, तोंडावाटे खायच्या गर्भप्रतिबंधक गोळ्या पहिल्यांदाच घेणे, व्यायाम न करता ऐषोरामात राहणे यांचा समावेश आहे.

स्तनाच्या कर्करोगाची चाचणी करुन घेण्यासंदर्भात एशियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कॉलॉजीचे कर्करोगतज्ज्ञ आणि रिक्न्स्त्रक्शन सर्जन डॉ. धैर्यशील सावंत यांनी खालील सल्ले दिले आहेत. स्तनांची स्वतः तपासणी करणे : वीस वर्षावरील प्रत्येक युवतीने मासिक पाळी संपल्यानंतर त्याच्या पुढील दिवशी आपल्या स्तनांची स्वतः तपासणी करावी. प्रत्येक महिन्याला ही तपासणी करणे आवश्यक आहे. क्लिनिकल तपासणी : वीस वर्षावरील प्रत्येक युवतीने वर्षातून एकदा दवाखान्यात जाऊन स्तन कर्करोगाबाबत डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावी. मॅमोग्राम्स : ४० वर्ष उलटून गेलेल्या महिलांना मॅमोग्राम चाचणी करुन घेण्याचा सल्ला दिला होता. ज्या कुटुंबामध्ये स्तन कॅन्सरचा इतिहास आहे, अशा कुटुंबातील २० वर्षांवरील युवतींनाही मॅमोग्राम चाचणी करुन घेण्याचा सल्ला देण्यात येतो.

रोगाचे प्रमाण आणि रुग्णाचे एकूण आरोग्य यांचा विचार करुन स्तन कॅन्सरवर कोणता उपचार करायचा, हे ठरविले जाते. शस्त्रक्रिया करताना हार्मोनल/केमोथेरपी/रॅडिएशन अशा शस्त्रक्रिया केल्या जातात. दोन नियमीत केल्या जाणार्या् शस्त्रक्रिया म्हणजे लंपेक्टोमी : कॅन्सरने बाधीत झालेली गाठ आणि तिच्या आजुबाजूच्या काही पेशी या उपचारामध्ये काढून टाकल्या जातात. यानंतर रुग्णावर केमो किवा रॅडिएशन उपचार केले जातात. मॅस्टेक्टोमी : शस्त्रक्रिया करुन संपूर्ण स्तन काढण्यात येते. रुग्णाला हवे असेल आणि खर्च परवडत असेल तर रिक्न्स्त्रक्शन करुन कृत्रिम स्तन बसविण्यात येते. जर कृत्रिम स्तन बसविण्यात आलेले असेल आणि पूर्वीसारखे आयुष्य स्त्री जगत असेल तर तिला कॅन्सर होऊन गेल्याचा फारसा मानसिक धक्का बसत नाही, असे इंडियन जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये प्रसिध्द झालेल्या संशोधनात नमूद करण्यात आले आहे. मॅस्टेक्टोमी केल्यानंतर रुग्णाला नेहमी हार्मोन थेरपी किवा केमोथेरपी करुन घेण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे कॅन्सरच्या उर्वरित पेशी मरुन जातात किवा पुन्हा कॅन्सर होण्याला प्रतिबंध बसतो. सर्व उपचार प्रक्रिया पार पडल्यानंतर रुग्णाला अँटी इस्त्रोजेन औषधे दिली जातात आणि दर तीन महिन्याला आरोग्याची तपासणी करण्यास सांगितले जाते.

स्तन कॅन्सर झालेल्या रुग्णांना नेहमी सेक्स, फर्टिलिटी, बाळंतपण, वित्तीय असुरक्षितता अशा समस्यांना सामोरे जावे लागते. स्वीडिश मेडिकल हॉस्पिटलने केलेल्या एका पाहणीनुसार ८५ टक्के स्तन कर्करोग झालेल्या महिलांना आपण मुलाला जन्म देऊ शकू का, या चितेने सतावलेले असते. एक चांगली बातमी म्हणजे स्तन कॅन्सरने बाधित असलेली महिला सेक्सचा आनंद घेऊ शकते. पण हे सेक्स नैसर्गिक असले पाहिजे. अशा परिस्थितीत अशा रुग्ण महिलेच्या पतीची जबाबदारी फार मोठी असते. सकारात्मक बोलून प्रोत्साहन दिले तर अशा महिलांना आत्मविश्वास परत मिळतो. स्तनाच्या कॅन्सरवर उपचार करीत असलेल्या महिलांसाठी कृत्रिम स्तन आणि विशेष प्रकारच्या ब्रा बाजारात सहजपणे मिळतात. ज्या महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाच्या गाठी नैसर्गिकपणे काढण्यात आलेल्या असतात, त्यांचा आत्मविश्वास फारसा ढळत नाही. स्तन कॅन्सरची शस्त्रक्रिया करणे आणि एकूण औषधोपचार हे खूपच महागडे आहे. पण एकूण खर्च कमी व्हावा, यासाठी काही विशेष प्रकारच्या क्लिनिकल चाचण्या केल्या जात आहेत. स्वस्त औषधे तयार करण्याचे प्रयत्न सुरु असून प्रभावी औषधांचीही गरज आहे.

Leave a Comment