नागपूर : संगीतकार श्रीधर फडके यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह देऊन गौरव

नागपूर दि ८ मार्च – स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दोन्हीही जन्मठेप म्हणजे ५० वर्षे सश्रम कारावासाकरिता अंदमानला पाठविण्यात आले होते.या घटनेच्या शताब्दी वर्षाच्या व स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्ताने हिदू महासभेतर्फे सुप्रसिद्ध संगीतकार श्रीधर फडके यांचा स्वातंत्र्यवीर स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. नुकत्याच झालेल्या एका समारंभात हिदू महासभेचे अध्यक्ष अरूण जोशी यांनी श्रीधर फडके यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अरूण जोशी म्हणाले की, संगीतकार सुधीर फडके यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चित्रपट निर्माण करून देशाला सावरकरांच्या राष्ट्रभक्तीचे दर्शन घडविले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रीधर फडके यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती चिन्ह देऊन गौरविले जात आहे. श्रीधर फडके यांनीदेखील वडिलांची परंपरा चालविलेली असून संगीत क्षेत्रात त्यांनी नावलौकीक प्राप्त केला आहे. ज्याप्रमाणे चंदन उगाळल्याशिवाय त्याचा सुवास येत नाही तसेच हे चंदन आहे, हेसुद्धा ओळखता येत नाही. मनुष्याने स्वतः झिजल्याशिवाय, परिश्रम घेतल्याशिवाय समाजसेवा करता येत नाही असे उद्गार प्राचार्य अरविद खांडेकर यांनी यावेळी काढले. यावेळी श्रीधर फडके यांनी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला…’ हे गीत सादर केले. तरूणांनी सावरक रांच्या जाज्वल्य देशभक्तीचा आदर्श आपल्यापुढे ठेवावा, असे आवाहन श्रीधर फडके यांनी वंदेमातरम् आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयघोषाने सर्व परिसर दुमदूमून गेला होता.

Leave a Comment