निवडणुका समोर ठेवून भाजपा काम करीत असल्याचा पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांचा आरोप

नागपूर ८ मार्च – येत्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपा महापालिकेत दुटप्पी धोरण राबवित असल्याचा आरोप राज्याचे अन्न पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.मालमत्ता कराला विरोध करणारे भाजपाचे नगरसेवक जेव्हा सभागृहात मालमत्ता कर वाढीचा ठराव झाला तेव्हा गप्प का बसले होते. आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून १० रु. च्या बेसरेटला विरोध करीत आहे. २२ जानेवारी २००८ रोजी मालमत्ता कर वाढविण्याचा ठराव महापालिकेच्या सभेत घेण्यात आला होता. आता तेच लोक बेसरेट वाढला म्हणून विरोध करीत आहेत असा आरोपही त्यांनी केला.

Leave a Comment