मुंबई : कृषी उत्पन्नात यंदा ३.८ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

मुंबई, ६ मार्च – चालू आर्थिक वर्षात अर्थात वर्ष २०११-१२ मध्ये देशाचा कृषी क्षेत्राचा विकास ३.८ टक्के दराने होईल, असा अंदाज सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी अर्थात सीएमआयईने व्यक्त केला आहे. सलग दुसर्यां वर्षी कृषी क्षेत्राची कामगिरी चांगली होणार आहे. चांगल्या हवामानामुळे अनेक पिकांचे विक्रमी उत्पादन होणार आहे. महत्वपूर्ण पिकांचे उत्पादन ३.१ टक्क्याने वाढण्याचा अंदाज असून किरकोळ पिकांचे उत्पादन पाच टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. खाद्यान्नाचे उत्पादन ३.७ टक्क्यांनी वाढून २३६.९ दशलक्ष टन इतके होण्याची शक्यता आहे. वर्ष २००८-०९ मध्ये २३४.५ दशलक्ष टन इतके विक्रमी खाद्यान्न उत्पादन झाले होते.

Leave a Comment