मुंबई : आले निर्यातीत दुपटीने वाढ

मुंबई, ६ मार्च – एप्रिल २०१० ते जानेवारी २०११ या कालावधीत देशाच्या आले निर्यातीत दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली असल्याची माहिती मसाले बोर्डाकडून देण्यात आली. सदर कालावधीत ४ हजार ६५० टन इतकी आल्याची निर्यात करण्यात आली. भारत, चीन आणि इंडोनेशिया हे जगातील प्रमुख आले उत्पादक देश आहेत.

वर्ष २००९-१० मध्ये देशाने ४ लाख १३ हजार ८९५ टनाच्या तुलनेत एकूण ४ लाख ३३ हजार ४५५ टन मसाल्यांची निर्यात केली होती. चलनाच्या तुलनेत विचार केला तर २३.४६ टक्के वाढीने ९७४.५७ दशलक्ष डॉलर्सच्या तुलनेत १२०३.३० दशलक्ष डॉलर्स इतकी मसाल्याची निर्यात झाली. रुपयाच्या भाषेत १८ टक्के वाढीने ५ हजार ४८५ कोटी रुपयांची मसाले निर्यात झाली.

Leave a Comment