नागपूर : राज्यातील परिवहन कार्यालये सुसज्ज करणार – गुलाबराव देवकर

नागपूर दि ०६ मार्च  राज्यातील एकूण महसूलात परिवहन विभागाचा वाटा मोठ्या प्रमाणात असूनही सोयीसुविधांसाठी पाहिजे त्याप्रमाणात निधी उपलब्ध होत नाही.त्यामुळे सर्व परिवहन कार्यालये सुसज्ज करण्यासाठी वेगळया निधीची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी दिली.

नागपूर शहर व ग्रामीण परिवहन कार्यालयाला नुकतीच देवकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील कामकाजाची माहिती घेतली व आवश्यक सूचनाही केल्या.

वाहनधारकांना संगणकीकृत अनुज्ञाप्ती देण्यासाठी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर कामाचा ताण पाहता या विभागातील रिक्त पदे भरण्याच्या संदर्भात तातडीने निर्णय घेण्यात येत आहे असेही देवकर यांनी सांगितले.

नागपुरात मिटर पद्धतीने ऑटोरिक्षा चालविण्यासंदर्भात नुकतीच बैठक घेण्यात आली असून अहवालावर येत्या आठ-दहा दिवसात निर्णय अपेक्षित आहे. मोठ्या शहरातील सर्व नवीन रिक्षांना प्रथम मीटरची सक्ती  करण्यात येणार असून टप्प्या-टप्प्याने जुन्या  रिक्षांना मीटरची सक्ती करण्यात येणार असल्याची माहितीही देवकर यांनी यावेळी दिली. सर्व चेकनाके ऑनलाईन पद्धतीने व कामात पारदर्शकता रहावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ज्या ग्राहकांना घरपोच लायसन्स पाहिजेत त्यांना ५० रुपये अतिरिक्त द्यावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील दलालांचा वावर थांबविण्यासाठी सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावणे आणि परिवहन कार्यालयात येणार्यार नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लागणाऱ्या निधीची वेगळी व्यवस्था करण्यात येत असल्याचे देवकर यांनी सांगितले.

एकाच ठिकाणी अनेक वर्षे झालेल्या कर्मचार्यांीच्या बदल्यांचे सुतोवाचही देवकर यांनी यावेळी केले. परिवहन कार्यालयात अनेक महत्त्वाचे दस्ताऐवज असल्याने व कामाचा व्याप लक्षात घेता सुरक्षा रक्षकांच्या नियुक्त्यांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे असे त्यांनी सांगितले. सध्या नवीन परमीट देणे बंद असल्याने राज्यात आणखी किती परमीट देता येतील, याविषयी चर्चा सुरू असून सध्या जुन्या परमीटला नवीन नोंदणी देण्यात येत आहे असेही देवकर म्हणाले.

Leave a Comment