नवी दिल्ली : हॉस्पिटलवरील सेवा करांमुळे औषधोपचार महागणार – फिक्की

नवी दिल्ली, ६ मार्च – खाजगी हॉस्पिटल्सवर आकारल्या जाणार्याक सेवा करांमुळे आगामी काळात औषधोपचार करुन घेणे महागणार असल्याची भीती फिक्की संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.ग्रामीण भागातील जनता आधीच महागाईने होरपळत आहे, त्यात औषधोपचार महाग झाला तर त्यांचे कंबरडेच मोडेल, असे फिक्कीकडून सांगण्यात आले.

वित्तमंत्री मुखर्जी यांनी अर्थसंकल्प सादर करताना खाजगी रुग्णालयांवर पाच टक्के सेवाकर आकारण्याची शिफारस केली होती. उपचार घेणारा पेशंट, विमा कंपन्या किवा इतर संबंधित कराची ही रक्कम अदा करतील. केवळ औषधोपचारासाठी सेवा कर लागू करण्यात आलेला आहे, असे नाही तर एखाद्या रोगाचे निदान करुन घेण्यासाठी अर्थात डायग्नोसिस करण्यासाठीदेखील सेवाकर भरावा लागला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना या निर्णयाचा मोठा फटका बसेल, असा अंदाज फिक्कीने व्यक्त केला.

Leave a Comment