नाशिक, ६ मार्च – कुसुमाग्रज हे एक विद्यापीठच आहे, असे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्षनेते, खा. गोपीनाथ मुंडे यांनी येथे केले. नाशिक येथे विवेक व्यासपीठ आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एक किरण सूर्याचा या कार्यक्रमात खा. मुंडे बोलत होते. व्यासपीठावर खा. प्रताप सोनावणे, खा. हरिश्चंद्र चव्हाण, रंजना पाटील, उपमहापौर प्रा. देवयानी फरांदे, विवेकचे कार्यकारी संपादक आबासाहेब पटवारी, संपादक दिलीप करंबळेकर आदी मान्यवर होते.
नाशिक : कुसुमाग्रज हे एक विद्यापीठच – खा. मुंडे
खा. मुंडे यावेळी बोलताना म्हणाले की, कुसुमाग्रज पक्के नाशिककर होते. कुसुमाग्रज हे एक विद्यापीठच आहे. व्यक्ती अजरामर नसली तरी त्याचे कार्य मागे उरते. तसे कुसुमाग्रजांचे साहित्य, काव्य, नाटके अजरामर आहे. यावेळी मंडे यांनी कुसुमाग्रज ग्रंथालयाला एक हजार ग्रंथ भेट देण्याची घोषणा केली.