विक्रमी स्वरांमध्ये झंकारले लयतरंग

नागपूर, २१ फ्रेब्रुवारी – तीन हजार कलावंतानी नृत्य, गायन आणि संगीताच्या माध्यमातून रेशीमबाग मैदानावरील ४८ हजार चौरसङ्गुटांच्या रंगमंचावर साकारलेले लयतरंगांनी रविवारी नागपुरकरांची मने जिकली.

 
शैलेष दाणी यांचे संगीत संयोजन आणि किशोर व किशोरी हम्पीहोळी यांचे नृत्य दिग्दर्शनदेखील या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. ओमकारा गजानना गौरीनंदना या भक्तीगीताने कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर सचिन लिमये यांच्या जोडीने दोन हजार गायकांनी शारदे सरस्वती हे गाणे गाऊन वातावरणात रंग भरला. पुढे रविशंकर यांनी आपल्यासोबत सर्वांना ध्यान लावायला  सांगितले व उद्बोधन केले. त्यानंतर कृष्णा कान्हा मुकुंदा मनोहरा हे गाणे कलावंतांनी सादर केले. प्रत्येक गाण्याला अप्रतिम शास्त्रीय नृत्याची जोड होती. यावेळी पुष्पा गोतमारे यांनी रंगमंचापुढे साकारलेली ६ हजार चौरसङ्गुटांची रांगोळी विशेष आकर्षण ठरले.

Leave a Comment