फुकट्या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेने वसूल केला तब्बल ३५८ कोटींचा दंड

मुंबई, २१ फेब्रुवारी – गेल्या जानेवारी महिन्यात पश्चिम रेल्वेने तब्बल ३५८ कोटी रुपयांचा दंड फुकट्या प्रवाशांकडून वसूल केला आहे. सुमारे सव्वा लाख प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून हा दंड वसूल करण्यात आला आहे. सदर कालावधीत १ लाख २५ हजार २६१ प्रवाशांना विनातिकीट पकडण्यात आले. डिसेंबर २०१० मध्ये वसूल करण्यात आलेल्या रकमेपेक्षा जानेवारी २०११ मध्ये वसूल करण्यात आलेली रक्कम १५.६० टक्क्यांनी जास्त आहे.

आपले तिकीट दुसर्यारला हस्तांतरित करणार्याक १४६ जणांवर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून १ लाख २५ हजार ३१३ रु. इतका दंड वसूल करण्यात आला. याशिवाय ८३० भिकारी आणि अनधिकृत हॉकर्स यांच्यावर कारवाई करण्यात आली. ५८१ जणांना रेल्वे परिसरातून बाहेर काढण्यात आले. ५५ जणांकडून १५ हजार ९९० रु. ची वसुली करण्यात आली. १९४ जणांवर गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून दंडापोटी ३८ हजार ५० रु. वसूल करण्यात आले. याशिवाय तीन जणांना तुरुंगात पाठविण्यात आले. सामाजिक अकृत्य करणार्यां वर कारवाई करण्यासाठी जानेवारीमध्ये १५५ वेळा तपासणी करण्यात आली.

रेल्वेच्या विविध नियमांचे उल्लंघन करणार्या  ५६३ लोकांवर कारवाई करण्यात आली आणि यापैकी ५६० जणांकडून दंड वसूल करण्यात आला. सुरक्षिणी पथकाकडून ४९१ भिकार्यांाना रेल्वे परिसरातून बाहेर काढण्यात आले. महिलांच्या डब्यातून प्रवास करणार्यान १२ वर्षांवरील २९५ शाळकरी मुलांवर कारवाई करण्यात आली. जबर दंड टाळण्यासाठी तसेच मानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी अधिकृत तिकीट काढून मगच प्रवास करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment