नागपुरातील विश्वकप सामन्यावर पावसाचे सावट

नागपूर, २१ फेब्रुवारी  – उपराजधानीत वरुणराजाने अचानक लावलेल्या हजेरीने व्हीसीए आणि क्रिकेटप्रेमींची चिता वाढली असून हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवल्यास विश्वकरंडकातील नागपुरात होणार्याय पहिल्या सामन्याचे भवितव्य अधांतरी दिसते. विदर्भातील ढगाळ वातावरण व पावसाळासदृष्य वातावरण आणखी एक-दोन दिवस राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

विश्व करंडकातील एकूण चार साखळी सामने व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर होणार आहेत. त्यातील पहिली लढत मंगळवारी इंग्लंड आणि नेदरलँड यांच्यात होणार आहे. सामना जेमतेम काही तासांवर येऊन ठेपला असून तयारी पूर्ण झाली आहे. मात्र वरुणराजामुळे सामना शेवटास जाईल की नाही, याबाबत आयोजकांसह सर्वांच्या मनात शंका आहे. नागपूर व विदर्भात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावर असून दुपारी ढगांची दाटी होऊन दहा ते पंधरा मिनिटे धारा बरसल्या. शहरातील इतरही अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. सुदैवाने जामठा मैदानावर पावसाचा थेंबही पडला नाही. पावसाचे नागपूरशी जुने नाते आहे. व्हीसीएनवरील अनेक सामन्यांत पावसाने हजेरी लावली होती.

Leave a Comment