जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी हेल्पलाईनची सुरुवात

मुंबई, २१ फेब्रुवारी – भारताची जनगणना २०११ अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात दुसर्या१ टप्प्याचे कामकाज ९ फेब्रुवारीपासून सुरु झाले असून २८ फेब्रुवारीपर्यंत हा टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सोयीसाठी जनगणना २०११ संदर्भात महापालिकेच्या वतीने सर्व २४ विभाग कार्यालयात मदत संफसेवा अर्थात हेल्पलाईन सोमवारपासून कार्यान्वित करण्यात आली आहे.


जनगणनेतंर्गत बृहन्मुंबई क्षेत्रात जनगणनेचे काम महापालिकेतर्फे  वेगाने पूर्ण केले जात आहे. दुसऱ्या टप्प्यात बृहन्मुंबई क्षेत्रातील ज्या व्यक्तींची अद्यापही नोंद झालेली नाही, त्यांच्यासाठी महापालिकेने प्रत्येक विभागात हेल्पलाईनद्वारे विशेष कक्ष कार्यान्वित करण्याचे निश्चित केले असून ह्या कक्षातील भ्रमणध्वनी क्रमांक २४ तास सोमवारपासून अव्याहतपणे कार्यरत राहील. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वसाधारणपणे कोणत्याही वेळी १० टक्के घरे बंद आढळतात. हे लक्षात घेता जनगणना कार्यावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून महापालिकेने हेल्पलाईन सेवा सुरु करुन दिली आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातही यशस्वीपणे हेल्पलाईन सुविधा राबविण्यात आली होती. परिणामी विहित कालावधीत मुंबई महापालिकेने जनगणनेचे काम पूर्ण केले होते. भ्रमणध्वनी क्रमांक लागला नाही तर त्या संबंधित भ्रमणध्वनीवर नागरिकांनी स्वतःचा निवासी/व्यावसायिक संपूर्ण पत्ता एसएमएसद्वारे पाठवावा. जेणेकरुन त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही संबंधित विभागाला करणे सुलभ होईल. अधिक माहिती अथवा मार्गदर्शन हवे असल्यास कार्यालयीन वेळेत व कार्यालयीन कामकाजाच्या विदशी महापालिकेशी संफ साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment