गोंदिया जिल्ह्यात सौरऊर्जेने होणार दुर्गम भागात पाणी पुरवठा

गोंदिया, २१ फ्रेब्रुवारी – गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी व अतिदुर्गम क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्याकरिता सौरऊर्जेचा उपयोग करण्याची योजना जिल्हा प्रशासनाने आखली असून याबाबतचा संपूर्ण मसुदा संबंधित विभागाला नुकताच पाठवण्यात आला असल्याची माहिती आहे.


सौरऊर्जेचा वापर करून आदिवासी व अतिदुर्गम भागातील विहिरी व बोअरवेलची दुरुस्ती करून आदिवासी क्षेत्रात पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम व आदिवासी क्षेत्रात निर्मित असलेल्या विहिरी आणि बोअरवेलमधून पाणी उपसा करण्याकरिता मोटरपंप नसल्यामुळे राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमांतर्गत सौरऊर्जेचा वापर करून या आदिवासी क्षेत्रातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. राष्ट*ीय ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम अंतर्गत आदिवासी व अतिदुर्गम क्षेत्रातील विहिरी व बोअरवेलमधून पाणी सोईस्कररित उपसा करण्याकरिता सौरऊर्जेचा वापर करून मोटरपंपाने पाणी उपसा करून पाणी पुरवठा केला जाणार आहे.


या करिता शासनाने १० कोटी रुपयाची एका उपाययोजनेचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला आहे. राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रातील एकूण २८१ गावात २०० विहिरी आणि बोअरवेल्सना मोटर पंप लावून सौरऊर्जेद्वारे या क्षेत्रातील नागरिकांनी पाणी पुरवठा केला जाणार आहे.

Leave a Comment