अॅपरल उद्योगाला विविध सवलती देण्याची मंधाना यांची मागणी

मुंबई, २१ फेब्रुवारी – देशातील औद्योगिक उत्पादनात वस्त्रोद्योगाचा वाटा १४ टक्के इतका असून एकूण निर्यातीत वाटा सुमारे ३० टक्के इतका आहे. निर्यातीपैकी १२ टक्के महसूल अॅपरल निर्यातीमधून प्राप्त होते. इतके असूनही सरकारने या क्षेत्राकडे कानाडोळा केला असून आगामी बजेटदरम्यान या उद्योगाला विविध सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी अॅपरल निर्यात क्षेत्रातील आघाडीची कंपनी मंधाना industry चे सहव्यवस्थापकीय संचालक मनीष मंधाना यांनी केली आहे.

अॅपरल उद्योगातील गुंतवणुकीला चालना देण्याची गरज असल्याचे सांगून मंधाना पुढे म्हणाले की, टीयूएफएस योजनेतंर्गत या उद्योगाला कमी व्याजदराने निधी दिला पाहिजे. आयकर कायद्याच्या कलम ८० एचएचसी अंतर्गत अॅपरल निर्यातदारांना आयकरात सुविधा दिली पाहिजे. पॅकिग क्रेडिटसाठी व्याजदरात जी सवलत दिली जाते, तीदेखील आगामी काळात कायम ठेवली पाहिजे. अमेरिका आणि युरोपमधील निर्यातीला चालना देण्याचे धोरण सरकारने स्वीकारावे, असे आवाहन मंधाना यांनी केले.

Leave a Comment