शिवनेरी किल्ला परिसर विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य

पुणे दि. १९ : शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार घालून आदरांजली वाहिली.

यावेळी शिवनेरी किल्ला परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देवून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवरायांच्या कार्याचा आणि प्रशासकीयय व्यवस्थेची प्रणाली समोर ठेवून कामकाज करण्यात यावे तसेच जुन्नर तालुका पर्यटन क्षेत्र एकात्मिक तिर्थ स्थान निर्माण करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेवू असे सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी किल्ल्याची ऐतिहासिक दहाटणी तशीच ठेवून परिसराचा विकास करण्यात येईल. आतापर्यंत शिवनेरी परिसर विकासावर दहा कोटी रुपये खर्च झाला असल्याचे सांगितले.

वन विभागा तर्फे उभारण्यात आलेल्या दुर्बीणीतून पर्यटनाचे निरिक्षण या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. स्थानिक महिलांनी शिवरायांचा पाळणा म्हटला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमास सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व किल्ले शिवनेरी परिसर विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार वल्लभ बेनके, विभागीय आयुक्त दिलीप बंड, जिल्हाधिकरी चंद्रकांत दळवी, शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment